शिरगाव किल्ला पालघर तालुक्यातील समुद्रकाठच्या बाजूला स्थित आहे.या किल्ल्याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराज यांनी अरबी समुद्रातुन येणाऱ्या शत्रुवरती लक्ष ठेवण्यासाठी केला होता. या प्राचीन किल्ल्याचे आता अवशेष शिल्लक आहेत. मराठ्यांच्या आधी पोर्तुगीजांचे या किल्ल्यावरती वर्चस्व होते.१८१८ मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांकडून हा किल्ला मिळविला . हा किल्ला २०० फूट उंच आणि १५० फूट हून अधिक लांबीचा आहे. पोर्तुगीजांनी हा किल्ला नूतनीकरण करून आणि त्याच्या क्षेत्रात वाढ करत असतांना मूळ वीट आणि लाल दगड बांधकाम अखंड ठेवले आहे . या किल्ल्याच्या उत्तर पश्चिम भागात पाच पाय तोफ युद्ध इतिहास चिन्हांकित आहे .स्वच्छता आणि देखण्या भोवतालचा परिसरामुळे नियमित पर्यटक व्यतिरिक्त इतिहासकारांना हा किल्ला नेहमीच आकर्षित करत आला आहे.सर्वात रोमांचक म्हणजे पाम वृक्षाचे झाड आहे ज्याला सहा ते सात शाखा आहेत . एक दुर्मिळता अशी आहे कि शिरगाव किल्ला तटबंदीचा आहे आणि भिंती चांगल्या स्थितीत आहेत.